सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली लस

अशोक चव्हाण यांनी आज मुंबईतील जे. जे. शासकीय रूग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली. यावेळी डॉ. तात्याराव लहाने व इतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

    राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुंबईतील जे. जे. शासकीय रूग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली. यावेळी डॉ. तात्याराव लहाने व इतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

    दरम्यान काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी करोनाची लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी लस घेतली. स्वत: लसीकरण करुन घेतल्यानंतर उद्धव यांनी राज्यातील जनतेलाही आवाहन केलं.