Pune tops in organ donation; Behind Mumbai

मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अयवदानाबाबतची जनजागृतीला ब्रेक लागला आहे. परिणामी वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अवयवदान प्रक्रिया काहीशी थांबली असल्याचे समोर येत आहे. तर राज्याची आर्थिक राजधानी देखील मुंबई शहरात देखील अवयवदान प्रक्रिया मागे पडली आहे. यंदा अवयवदानात आर्थिक राजधानी दुसऱ्या क्रमांकावर असून पुणे शहराने पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली आहे.

नीता परब, मुंबई : ‘‘अवयवदान सर्वश्रेष्ठ दान’’ असं म्हटलं जातं, मागील तीन ते चार वर्षांपासून अवयवदानाबाबत राज्य आरोग्य विभाग युध्दपातळीवर जनजागृती करत आहे. ज्यामुळे राज्यात अवयदानाबाबत नागरिक जागृत होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. शिवाय अवयवदान करण्याकरीताही नागरिक पुढे सरसावत आहेत.

परंतु, मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अयवदानाबाबतची जनजागृतीला ब्रेक लागला आहे. परिणामी वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अवयवदान प्रक्रिया काहीशी थांबली असल्याचे समोर येत आहे. तर राज्याची आर्थिक राजधानी देखील मुंबई शहरात देखील अवयवदान प्रक्रिया मागे पडली आहे. यंदा अवयवदानात आर्थिक राजधानी दुसऱ्या क्रमांकावर असून पुणे शहराने पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली आहे.

राज्यात अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी आरोग्य विभाग सामाजिक संस्था, वरिष्ठ डॉक्टर, आरोग्य संघटना यांच्या मदतीने मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत. २०१९ मध्ये ब्रेन डेड १६० रुग्णांच्या नातेवाईकांनी पुढे येवून अवयवदानाकरीता सहमती दिली होती. ज्यामुळे ४५० गरजूंना अवयवदान करण्यात आले व त्यांना नवजीवन मिळाले.

परंतु यंदा कोरोना महामारीमुळे ७० टक्के अवयवदान कमी झाल्याचे समोर आले आहे. राज्यात यंदा ६६ रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला. यात पुणेकरांचा सहभाग अधिक असून ३४ अवयवदान हे पुण्यात झाले, असल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वक समितीच्या (झेडटीसीसी) अधिकाऱ्यांनी दिली.

गत वर्षीच्या तुलनेत मुंबईत यंदा अवयवदान कमी झाले असून २०१९ मध्ये डिसेंबरपर्यंत ४८ अवयवदान झाले होते. तर २०२० मध्ये आतापर्यंत( डिसेंबर) ३० अवयवदान झाले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याशिवाय नागपूरमध्ये  सर्वाधिक कमी अवयवदान झाले असून २ जणांनी अवयवदान केल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे यंदा ७० टक्के  अवयवदान कमी झाले आहे.

राज्य कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगीतले की, मागील काही महिन्यांपासून अनेक रुग्णालये ही कोविड रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. यात नॉन कोविड रुग्णालय खूपच कमी होती. शिवाय लॉकडाऊनमुळे दळणवळण साधने ठप्प होती. यामुळे अपघाती  तसेच इतर कारणांमुळे होणारे मृत्यू कमी झालेत. तसेच ब्रेनडेड, ब्रेन स्ट्रोक असलेले रुग्ण यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्यांना आम्ही डोनर म्हणून घोषीत करु शकत नाही, परिणामी, अयवदानात यंदा घट झाली.

जेडटीसीसीच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ५,७२९ जणांना किडनीची गरज आहे. १,११२ जणांना लिव्हरची आवश्यकता आहे. तर, ७१ जणांना ह्रदयाची आवश्यकता आहे. तसेच १७ जणांना फुप्फस प्रत्यारोपणाची गरज आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात ६६ जणांनी अवयव दान केले. यापैकी पुण्यात ३४ जणांनी, मुंबईत ३० जणांनी तर नागपूरात फक्त दोघांनी अवयव दान केले.