पंजाब अँड महाराष्ट्रा-को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना दिलासा, १ लाखापर्यंत रक्कम काढता येणार

मुंबई - रिझर्व्ह बँक इंडियाने पंजाब अँड महाराष्ट्रा-को-ऑपरेटिव्ह बँकवर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी निर्बंध घातले होते. तसेच पीएमसी बँकेच्या अष्टमंडळ ही बरखास्त केले होते. याचा मनस्ताप

 मुंबई –  रिझर्व्ह बँक इंडियाने पंजाब अँड महाराष्ट्रा-को-ऑपरेटिव्ह बँकवर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी निर्बंध घातले होते. तसेच पीएमसी बँकेच्या अष्टमंडळ ही बरखास्त केले होते. याचा मनस्ताप सर्वसामान्य लोकांना भोगावा लागत आहे. पंजाब अँड महाराष्ट्रा बँकेतील खातेदारांचे खाते गोठविण्यात आले होते. तसेच पैसे काढण्यास निर्बंध घातले होते. पहिले पैसे काढण्यासाठी ५० हजरांची मर्यादा होती. ती आता १ लाखपर्यंत केली आहे. यामुळे खातेदारांना दिलासा मिळाला आहे. 

रिझर्व्ह बँकने पीएमसी बँकेवर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी निर्बंध घातले आहेत. पैसे काढण्यासाठी जरी १ लाखाची मंजूरी दिली असली तरी बँकेवरील निर्बंध ६ महिने वाढविले आहेत. पहिले खात्यातून १० हजार काढण्यास मर्यादा होती. ती वाढवून २० हजार करण्यात आली नंतर कालांतराने ती ५० हजार करण्यात आली. आता ती १ लाख करण्यात आली आहे. यामुळे खातेदारांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.