पंजाब नॅशनल बँकेने आयोजित केलं ‘फिट इंडिया फ्रीडम रन 2.0’

'फिटनेस की डोस रोज अर्धा तास' या आकर्षक बोधवाक्याने देशभरात व्हर्चुअल पद्धतीने सुरू करण्यात आले. फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 सर्व नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात किमान 30 मिनिटांच्या शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त राहण्यास प्रोत्साहित करते.

    मुंबई : निरोगी जीवनशैली आणि फिटनेस संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजित केले. केंद्र सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत ही फ्रीडम रन आयोजित करण्यात आली होती. ‘फिटनेस की डोस रोज अर्धा तास’ या आकर्षक बोधवाक्याने देशभरात व्हर्चुअल पद्धतीने सुरू करण्यात आले. फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 सर्व नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात किमान 30 मिनिटांच्या शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त राहण्यास प्रोत्साहित करते.

    फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 ची थीम जन भागीदारीसे जन आंदोलन आहे. हे अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की, कोविड प्रोटोकॉलचे पालन करून लाखो लोक प्रत्यक्ष रनमध्ये भाग घेऊ शकतात किंवा कोठेही कुठेही व्हर्चुअल रनचा भाग बनू शकतात. या प्रसंगी कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करून बँक कर्मचाऱ्यांसह, कार्यकारी संचालक श्री विजय दुबे आणि कार्यकारी संचालक श्री स्वरूप कुमार साहा यांच्यासह पीएनबी मुख्यालय द्वारका येथे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    सार्वजनिक जागरूकता पसरवण्यासाठी आणि पीएनबी कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन कामातून मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले रहावे यासाठी थोडा वेळ काढण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यामुळे त्यांनी या रनमध्ये  भाग घेतला. देशभरातील पीएनबीच्या झोनल आणि सर्कल ऑफिसमध्ये फिटनेस रनचेही आयोजन करण्यात आले होते. येत्या काळात, पीएनबी एक व्हर्चुअल रन आयोजित करेल ज्यामध्ये स हभागी त्यांच्या इच्छेनुसार वेळ आणि मार्ग निवडून सहभागी होऊ शकतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ब्रेक वगैरे घेऊ शकता.