Push Narayan Rane! Lookout notice issued against Neelam Rane, MLA Nitesh Rane; Action of Pune Crime Branch

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने राणेंविरोधात थकबाकी प्रकरणी तक्रार दाखल होती. नीलम राणे सहअर्जदार असलेल्या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होते. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देखील डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होते. या कर्जाची ३४ कोटीपर्यंत थकबाकी आहे.

    मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना एक जबरदस्त धक्का बसला आहे. राणेंच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणेंविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. पुणे क्राईमब्रांचने ही कारवाई केली आहे. ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.

    दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने राणेंविरोधात थकबाकी प्रकरणी तक्रार दाखल होती. नीलम राणे सहअर्जदार असलेल्या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होते. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.
    याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देखील डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होते. या कर्जाची ३४ कोटीपर्यंत थकबाकी आहे.

    डीएचएफएलने संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे. ३ सप्टेंबर रोजी ही लुकआउट नोटीस पाठवण्यात आली असल्याचे समजते. सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे.