raosaheb danave

कुठलेही संकट आले की केंद्र सरकार कडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणे हीच आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे, अशी टीका केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केली. आज केंद्र सरकारकडून मिळण्याऱ्या सर्व मदतीमध्ये, महाराष्ट्र राज्याला मिळणारा वाटा सर्वात मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकार महाराष्ट्र राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. आरोग्य सुविधांसंबंधित योजनांचा खर्च केंद्र सरकार वहन करणार आहे. त्यासोबत यामध्ये ७ वर्षा साठी लागणारा देखभाल खर्च देखील केंद्र सरकार देणार आहे. पण महाराष्ट्र सरकारकडून असे काहीही झाले नाही व यातूनच महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा आणि बेजवाबदारपणा स्पष्टपणे दिसून येतो, असेही दानवे म्हणाले.

    मुंबई : कुठलेही संकट आले की केंद्र सरकार कडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणे हीच आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे, अशी टीका केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केली. आज केंद्र सरकारकडून मिळण्याऱ्या सर्व मदतीमध्ये, महाराष्ट्र राज्याला मिळणारा वाटा सर्वात मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकार महाराष्ट्र राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. आरोग्य सुविधांसंबंधित योजनांचा खर्च केंद्र सरकार वहन करणार आहे. त्यासोबत यामध्ये ७ वर्षा साठी लागणारा देखभाल खर्च देखील केंद्र सरकार देणार आहे. पण महाराष्ट्र सरकारकडून असे काहीही झाले नाही व यातूनच महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा आणि बेजवाबदारपणा स्पष्टपणे दिसून येतो, असेही दानवे म्हणाले.

    कोविड संक्रमणाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे. आता जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नाही, तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकार वर दोषारोप सुरू केले आहे.
    केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

    भारत सरकारकडून सर्व राज्यांमधील सार्वजनिक आरोग्य सुविधा स्थापित करण्यासाठी १६२ प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची मंजुरी जानेवारी २०२१ ला दिली होती. मंजूर केलेल्या १६२ प्लांट्समधून अश्या १० प्लांट्सच्या इंस्टॉलेशनची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने या दिशेने कोणते ही कठोर पाऊले उचलली नाहीत. जानेवारी २०२१ ला मंजुरी दिली असून, या विषयावर युद्ध पातळीवर जर काम केले असते तर आज परिस्थिती वेगळी असती, असे दानवे म्हणाले.

    महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रीक टन ऑक्सिजन दिले आहे तसेच महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देखील केंद्र सरकारने दिली आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचादेखील सर्वाधिक वाटा मिळतो आहे.