अतुल भातखळकरांचा राऊतांना जोरदार टोला ; म्हणे ‘हे’ काम कराच, लोक आतुरतेने वाट पाहतायत

हीच वेळ साधत अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मुंडे आणि मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की, जोरदार समर्थन करा आणि केंद्र सरकार कसे दोषी आहे हेही सांगा. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत”, अशा शब्दात भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

मुंबई : धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या जावई प्रकरणात महाविकास आघाडी सरकार अडचणीत आहे. यावरुन भाजपने सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांत सामनातील अग्रलेखातून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, आता धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या जावई प्रकरणात महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. हीच वेळ साधत अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मुंडे आणि मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की, जोरदार समर्थन करा आणि केंद्र सरकार कसे दोषी आहे हेही सांगा. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत”, अशा शब्दात भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

नवाब मलिकांवर निशाणा

ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव आल्यानंतर भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. “नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आले का?”, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.