जेजे हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिकांसह ६० कर्मचारी क्वारंटाईन

मुंबई: जे जे हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी असे ६० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचे

मुंबई: जे जे हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी असे ६० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचे स्वाबही तपासणीला पाठवण्यात आले आहेत. जे जे हॉस्पिटलमध्ये ८ एप्रिलला स्ट्रोक आलेली एक व्यक्ती उपचारांसाठी दाखल झाली. त्या व्यक्तीवर वार्ड क्रमांक ९ मध्ये उपचार सुरू होते. 

मात्र दोन दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर, या व्यक्तीचा स्वाब घेऊन कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आला. स्वाब तपासणीच्या अहवालनंतर ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी असे तब्बल ६० जणांना तातडीने वार्ड क्रमांक ४२ मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका रुग्णाला अचानक ताप आल्याने हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती. मात्र सुदैवाने तो रुग्ण निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र तरीही कर्मचाऱ्यांची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.