अभिनेत्री आणि बाॅलिवूड क्विन कंगना राणावत
अभिनेत्री आणि बाॅलिवूड क्विन कंगना राणावत

बिनधास्त वक्तव्य आणि कोणाशीही पंगा घेण्यासाठी एका पायावर उभी असलेली बाॅलिवूडची स्वयंघोषित क्वीन कंगना राणावत अलीकडेच तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्वीटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. हा वाद शमते ना शमते तोच तिच्या दुसऱ्या ट्विटमुळे ती पुन्हा वादाच्या कचाट्यात सापडली आहे.

मुंबई (Mumbai).  बिनधास्त वक्तव्य आणि कोणाशीही पंगा घेण्यासाठी एका पायावर उभी असलेली बाॅलिवूडची स्वयंघोषित क्वीन कंगना राणावत अलीकडेच तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्वीटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. हा वाद शमते ना शमते तोच तिच्या दुसऱ्या ट्विटमुळे ती पुन्हा वादाच्या कचाट्यात सापडली आहे.

कंगणा तिच्या ट्विटर हॅंडलवर स्वत:ला हॉटेस्ट टार्गेट म्हणवून घेते. कंगनाने ट्वीटमध्ये लिहीलं आहे, ‘मी सध्याची हॉटेस्ट टार्गेट आहे. मला टार्गेट केलं की तुम्ही मीडियामध्येही प्रसिद्ध व्हाल, मूव्ही माफिया तुम्हाला मोठ-मोठे रोल देतील, तुम्हाला नव्या फिल्म मिळतील, फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स दिले जातील.’ पुढे उपरोधित स्वरात ती लिहीते, ‘जर मी डॉन असते तर 27 प्रदेशांचे पोलीस माझ्या मागे लागले असते.’ कंगनाने या ट्वीटमधून अनेकांचा नाव न घेता समाचार घेतला आहे.

अभिनेत्री कंगना राणावतने दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh), मिक्का सिंह (Mika Singh) आणि भोजपूरी अभिनेता खेसारी लाल यादव यांच्याशी नुकताच पंगा घेतला आहे. त्यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनानं शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर नाराजी दर्शवली. त्यावेळी दिलजीत दोसांझनंदेखील कंगनाला टार्गेट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यामध्ये Twitter War चांगलंच रंगलं होतं.

गायक मिक्का सिंहनेही तिचा ट्विटवरुन समाचार घेतला होता मिक्काने लिहीलं होतं, ‘तुझं टार्गेट नक्की कोण आहे हे तरी समजू दे. तुझ्यामध्ये एवढं टॅलेंट आहे तर ते अभिनयामध्ये दाखव ना. तुझ्यात अचानक एवढी देशभक्ती कुठून जागी झाली?’ कंगनाच्या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनीही तिच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स केल्या आहेत.