महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढत चाललाय, या गुन्हेगारांना वेसण कोण घालणार?; आमदार नितेश राणे यांचा सवाल

पोलीस खातं हे सुद्धा नेते मंडळींना वाचवण्यासाठी जर त्याचा फायदा घेतला जात असेल. तर या गुन्हेगारांची भीतीच संपलेली आहे. म्हणून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे उडवले जात आहेत. त्यामुळे सर्व गोष्टी बाजूला ठेवून दोन दिवसांचं अधिवेशन हे फक्त महिला सुरक्षिततेवर बोलवावं अशी मागणी मी या निमित्ताने करतो. असे नितेश राणे म्हणाले.

    मुंबई : महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढत चालला आहे. पुणे, मुंबई आणि अमरावती असो ज्या पद्धतीने गुन्हेगारांची हिंमत वाढतेय. त्याचं मुख्य कारणच आहे. राज्याचे मंत्री आणि सत्ताधारी नेते महिलांवर अत्याचार करून राजरोष पद्धतीने जर फिरत असतील आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई जर होत नसेल. तर गुन्हेगारांसाठी हे खुले मैदानाच भेटलेले आहे. असे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

    नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून साधलेला संवाद

    एका बाजूला दिशा सालियानचं प्रकरण असो, पूजा चव्हाणचं प्रकरणं असो. करूणा मुंडे यांचं प्रकरण असो किंवा राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाचं प्रकरण असो आणि डॉ. पाटकर यांचा विषय असो. सगळ्या बाबतीमध्ये सत्ताधारी नेते मंडळी आणि सत्तेमध्ये बसलेले मंत्रीच जर महिलांवर अत्याचार करत असतील. तर या गुन्हेगारांना थांबवणार कोण?, अशा प्रकारचे अनेक प्रश्न राणे यांनी उपस्थित केले आहेत.