BKC येथे लसीकरणासाठी पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा ; लस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त

दिवसामध्ये फक्त १०० लोकांना लसीकरण दिले जात आहे. मागील आठवड्यातही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे तीन दिवस शहरातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

    मुंबई: पुरेश्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर आपल्यालाही लसीचा डोस मिळावा यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावलेल्याचे चित्र दिसून आले असून, लसीकरण केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे.

    नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन-तीन दिवसांपासून लोक रांगेमध्ये उभे आहेत. लोकांना लस मिळत नाहीये. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसत आहे. लाईन लावून सुद्धा लस मिळत नाही. दिवसामध्ये फक्त १०० लोकांना लसीकरण दिले जात आहे. मागील आठवड्यातही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे तीन दिवस शहरातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर कालपासून लसीकरणास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.