shivsena and Bjp

शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर दोन्ही पक्षांच्या  नेत्यांनी एकमेकांना इशारे देत टिका केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर, सचिन अहीर, खा अरविंद सावंत, सदा सरवरणकर यांनी तर अंगावर याल तर शिंगावर घेवू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी रामाचे नाव बदनाम करू नका आणि प्रविण दरेकर यानी हे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

    मुंबई : शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर दोन्ही पक्षांच्या  नेत्यांनी एकमेकांना इशारे देत टिका केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर, सचिन अहीर, खा अरविंद सावंत, सदा सरवरणकर यांनी तर अंगावर याल तर शिंगावर घेवू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी रामाचे नाव बदनाम करू नका आणि प्रविण दरेकर यानी हे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

    महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, शिवसेना भवन हे श्रद्धास्थान आहे त्याच्यासमोर मोर्चाची काही गरज नव्हती. तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय?, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

    शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही या राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचे भाजपचे आंदोलन निषेधार्ह आहे. शिवसेनेची राम जन्मभूमीबद्दल भूमिका काय आहे हे कोणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाही . शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनण्याआधी आणि बनल्यानंतरही राम जन्मभूमीला भेट देऊन आले आहेत, असे सांगत तुम्ही अॅक्शन कराल तर त्याला रिअॅक्शन मिळणारच. असा इशारा सचिन अहिर यांनी दिला आहे.

    खा. अरविंद सांवत यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? राम मंदिर भूखंड घोटाळ्याची चौकशी व्हावी. इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखे काय होते? प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचे कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली?, असा सवालही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.

    दरम्यान, या राड्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचे कवच घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. आमच्या आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळे वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवे. पण सरकार आमचे आहे, असे म्हणून पोलिसांसमोर वाटेल ती दादागिरी करणे चुकीचे आहे आणि ते खपवून घेणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

    भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, पोलीसांनी निपक्षपाती भुमिका घेत गुन्हे दाखल केले पाहीजेत मात्र सत्तेचा वापर करत शिवसेनेकडून दबाव आणला जात असल्याचे दिसत असेल तर असे मोर्चे अजून निघतील.