एमपीएससी आणि रेल्वेची एकाच दिवशी परीक्षा, एकच परीक्षा देता येणार असल्यामुळे विद्यार्थी नाराज

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा आणि रेल्वे बोर्डाची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २१ मार्च रोजी होणार असल्यामुळे विद्यार्थ्याची पंचाईत झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांना बसण्याची इच्छा आहे. दोन्ही परीक्षा देऊन ज्या ठिकाणी निवड होईल, त्या ठिकाणी रुजू होण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र आता एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी केवळ एकाच परीक्षेला बसता येणार आहे.

    महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा रंद्द करण्याच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानंतर ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा आठवड्याच्या आत घेतली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर यंत्रणेला जाग आली आणि एमपीएससीची प्रवेश परीक्षा २१ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता रेल्वेची परीक्षादेखील त्याच दिवशी असल्याचं लक्षात आल्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत झालीय.

    महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा आणि रेल्वे बोर्डाची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २१ मार्च रोजी होणार असल्यामुळे विद्यार्थ्याची पंचाईत झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांना बसण्याची इच्छा आहे. दोन्ही परीक्षा देऊन ज्या ठिकाणी निवड होईल, त्या ठिकाणी रुजू होण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र आता एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी केवळ एकाच परीक्षेला बसता येणार आहे.

    रेल्वेची परीक्षा ही पूर्वनियोजित आहे. रेल्वे परीक्षेची तारीख एमपीएससी परीक्षेच्या कित्येक दिवस आधी जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेच्या ३२ हजार २०८ जागांसाठी ही परीक्षा होत असून त्यासाठी पाचव्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहेत. देशभरातून १९ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील,असा अंदाज आहे. या परीक्षेची बहुतांश केंद्रं ही शहरी भागात आहेत. ज्या भागात लॉकडाऊन आहे, त्या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, ज्यांची शहरात राहण्याची सोय नाही, त्या विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करत परीक्षा द्यावी लागणार आहे.

    लॉकडाऊनच्या काळात गावी परतलेले विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करत होते. परीक्षा देण्यासाठी त्यांनी जाण्यायेण्याचं रेल्वे बुकिंग केलं होतं. मात्र आयोगाने परीक्षाच पुढे ढकलल्यामुळे या विद्यार्थ्यांना तिकीटे रद्द करावी लागली. आयत्या वेळी विद्यार्थ्यांना आता तिकीटे मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुुळे परीक्षेला शहरात जायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय.

    राज्यसेवा आयोग आणि रेल्वे यांनी परस्पर समन्वय साधून हा घोळ संपवावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.