रेल्वेने लॉकडाऊन १२ ऑगस्टपर्यंत वाढविला

मुंबई - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. या कालावधीत प्रवासाचे मुख्यसाधन असलेल्या रेल्वे, उपनगरीय लोकही बंद ठेवण्यात आल्या होत्या. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, काही प्रमाणात विशेष रेल्वे आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय लोकल सुरु करण्यात आल्या आहेत.

 विशेष रेल्वे वगळता एक्सप्रेस, उपनगरीय लोकलसेवा बंदच राहणार 

मुंबई – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. या कालावधीत प्रवासाचे मुख्यसाधन असलेल्या रेल्वे, उपनगरीय लोकही बंद ठेवण्यात आल्या होत्या. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, काही प्रमाणात विशेष रेल्वे आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय लोकल सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झालेल्या नाहीत. आता रेल्वेने काढलेल्या एका पत्रकानुसार १२ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची माहिती आहे. रेल्वे बोर्डाने काढलेल्या या पत्रकात १ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत विशेष रेल्वे वगळता कोणत्याही रेल्वे एक्सप्रेस, पंसेंजर आणि उपनगरीय रेल्वे धावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या काळात ज्यांनी रेल्वेचे तिकिट बुकिंग केले असेल त्यांचे तिकिटांचे पैसे परत केले जाणार आहेत.    
 
रेल्वेने लॉकडाऊन वाढवला असून १२ ऑगस्टपर्यंत रेल्वेप्रवास करता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वेप्रवास दूरच राहणार आहे. विशेष रेल्वे वगळता इतर पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या १२ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या साहाय्याने प्रवासाची स्वप्न बघणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. कोव्हिड-१९ मुळे जवळपास ३ महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. त्यातच रेल्वेने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने १४ एप्रिल रोजी आणि त्याआधी करण्यात आलेल्या सर्व रेग्यूलर वेळापत्रकानुसार धावण्यात येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. या बुकिंगचा पूर्ण रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. सामान्य प्रवासी रेल्वे सुरु होण्यासाठीची कोणतीही तारीख रेल्वेकडून देण्यात आलेली नाही. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अनलॉकच्या पहिल्या टर्र्यात देशआतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय़ घेतला असल्याची शक्यता आहे.