रेल्वेची ऑगस्टमध्ये विक्रमी ५ लाख पासविक्री, मध्य रेल्वेवर डोंबिवली स्थानक आघाडीवर

मध्य रेल्वेने सर्वाधिक पास विक्री केली आहे. मध्य रेल्वेवर आतापर्यंत दोन लाख ७४ हजाराहून अधिक पासची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली. तर पश्चिम रेल्वेवर हीच संख्या एक लाख २५ हजार ४७३ एवढी आहे. मध्य रेल्वेवर सर्वाधिक पासची विक्र डोंबिवली स्थानकात झाल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीचे ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना १५ ऑगस्टपासून मुंबईत लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकरन घेतला होता. त्यामुळे या निर्णयामुळं प्रवासाना दिलासा मिळाला होता. त्यामुळे लसीचे दोन डोस घेण्यासाठी मुंबईकरांनी प्राधान्य दिले. मुंबईत बऱ्यापैकी आता लसीकरण झाल्यामुळे मासिक पास घेणाऱ्यांची संख्या वाढत असून, पास घेण्यासाठी तिकिट खिडकीवर प्रवासांची गर्दी होतान दिसत आहे. आतापर्यंत चार लाखांहून अधिक पासची विक्री झाल्याची माहिती रेल्वेने दिली

    मध्य रेल्वेने सर्वाधिक पास विक्री केली आहे. मध्य रेल्वेवर आतापर्यंत दोन लाख ७४ हजाराहून अधिक पासची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली. तर पश्चिम रेल्वेवर हीच संख्या एक लाख २५ हजार ४७३ एवढी आहे. मध्य रेल्वेवर सर्वाधिक पासची विक्री डोंबिवली स्थानकात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ कल्याण, ठाणे, बदलापूर, इत्यादी स्थानकातूनही पासांची खरेदी झाली आहे. पश्चिम रेल्वेवरही बोरीवली, भाईंदर, कांदिवली, अंधेरी,  गोरेगाव इत्यादी स्थानकातून सर्वाधिक मासिक पास घेण्यात आले आहेत.

    ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहे, त्यांनाच रेल्वेकडून मासिक पास मिळत आहे, तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना याआधीच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस झाले आहेत त्यांना तसेच लस घेतल्याचे सर्टफिकिट रेल्वेला दाखवल्यानंतरच पाससठी रेल्वेकडून हिरवा कंदिल दाखवण्यात येतो. त्यामुळं आता लसीकरणासाठी मुंबईकर लसीकरण केंद्रावर गर्दी करतानाचे चित्र पाहयला मिळत आहे.