मुंबईत पावसाची विश्रांती; विदर्भातील या जिल्ह्यांत कोसळणार सरी

मुंबईत (Mumbai Rain) आज पावसानं विश्रांती घेतली आहे. पण याठिकाणी अद्याप ढगाळ वातावरण असून हवामान खात्यानं पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पण आज मुंबईत पावसानं विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांना थोडा फार प्रमाणात दिलासा मिळत आहे.

    मुंबई : आज मुंबईसह, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. त्याचबरोबर आज मुंबईत सायंकाळी उशीरा मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    मुंबईत (Mumbai Rain) आज पावसानं विश्रांती घेतली आहे. पण याठिकाणी अद्याप ढगाळ वातावरण असून हवामान खात्यानं पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पण आज मुंबईत पावसानं विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांना थोडा फार प्रमाणात दिलासा मिळत आहे.

    मागील दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. काल उस्मानाबाद, बीड आणि परभणी या जिल्ह्यात पावसानं चांगलाचं जोर पकडला होता. बीड जिल्हातील केज तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून याठिकाणी 65 मीमी इतका पाऊस पडला आहे.