पावसाचे धुमशान; मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा

    मुंबई : शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाने मुंबईला चांगलाच तडाखा दिला. काही भागात संततधार तर काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली बुडाले. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील चोवीस तासांत मुंबईत अतिवृष्टीचा धोका असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

    काही भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. रस्ते पाण्याखाली बुडाल्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूकचे मार्ग बदलण्यात आली. यासोबतच, लोकल सेवाही विस्कळीत झाली.

    ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेबरोबरच आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. दहिसर चेक नाका परिसरात तर अतिवृष्टीने कहर केल्यान रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.