पाऊस केरळच्या उंबरठ्यावर; महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन

नैर्ऋत्य मोसमी पाऊस केरळच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राकडे कूच करेल.

  मुंबई : नैर्ऋत्य मोसमी पाऊस केरळच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राकडे कूच करेल.

  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 11 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान, पुणे, साताऱ्यासह विदर्भाच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

  मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. विजेच्या कडकडाटसह पुढील तीन तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा