months worth rain just twelve hours mumbaikars have suffered

मुंबईत रविवारी रात्री पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. येत्या २४ तासांत वातावरण ढगाळ राहणार असून हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. त्यात पावसाच्या सरींनी वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

    मुंबई : मुंबईत रविवारी रात्री पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. येत्या २४ तासांत वातावरण ढगाळ राहणार असून हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. त्यात पावसाच्या सरींनी वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

    मुंबईत काल रविवारी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शिवाय येत्या २४ तासांत मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्याने उन्हाचे चटके सहन करणा-या मुंबईकरांना हायसे वाटले आहे.

    पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.