2 दिवसांपासून राजधानीत पावसाचं धूमशान; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

आज मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांच्या कडकडासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

    मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबईतील अनेक रस्ते तुंडुंब भरल्यानं परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक रस्त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे विमान उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात येत आहेत.

    दरम्यान आजही मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांच्या कडकडासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.

    त्यामुळे नागरिकांनी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दादर, परळ, वडाळा, सायन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. यासोबतचं मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील पाणी साचलं आहे. त्यामुळे विमान उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल रेल्वेदेखील उशिरा धावत होती.

    विशेष म्हणजे, मागील 24 तासांत मुंबईत तब्बल 253.3 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या 12 वर्षात तिसऱ्यांदाच जुलै महिन्यात मुंबईत इतका पाऊस पाऊस झाला आहे. पुढील एक दोन दिवसांत मुंबईत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. सांताक्रूझ वेधशाळेनं जारी केलेल्या माहितीनुसार, 1 जूनपासून मुंबईत 1,544.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा सरासरी पावसापेक्षा 609.1 मिमीनं कमी आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळाधार पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी राज्यात अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस झाला नाही.