मुंबईत दिवसभर पावसाचा मुक्काम , जाेरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी

मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलाेट क्षेत्रात आज चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलावांच्या जलसाठ्यात लक्षणिय वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली. शाॅर्ट सर्कीट आणि झाडे पडण्याच्या तुरळक घटना घडल्या. मात्र त्याच जिवित हानी झाली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालिन विभागाने दिली.

  मुंबई – मुंबईत आज दिवसभर पावसाचा मुक्काम हाेता. उपनगराच्या काही भागात जाेरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी पडल्या. सकाळी नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची माेठी तारांबळ उडाली. मात्र त्याचा रस्ते वाहतूकीवर किंवा रेल्वे सेवेवर परिणाम झाला नाही. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलाेट क्षेत्रात आज चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलावांच्या जलसाठ्यात लक्षणिय वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली. शाॅर्ट सर्कीट आणि झाडे पडण्याच्या तुरळक घटना घडल्या. मात्र त्याच जिवित हानी झाली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालिन विभागाने दिली.

  शहर आणि उपनगरात आज दिवसभर वातावरण ढगाळलेले होते. पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू हाेती. दिवसभर पावसाने उसंत घेतलेली नाही त्यामुळे संध्याकाळी घरी परतणार्या नागरिकांची दैना उडाली. दाेन दिवसापासून ढगाळ वातावरण असून आजही पहाटेपासून सरीसरींनी पाऊस सुरू हाेता. शहर भागात 9.04 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 4.31 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 10.71 मिलिमीटर इतक्या पावसाची दिवसभरात नोंद झाली. शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर अधिक असला तरी त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

  मुंबईच्या काही भागात जोराच्या सारी कोसळण्याची शक्यता असून पुढील चाेवीस तासात शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.अधूनमधून पावसाच्या तीव्र सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईत पाच ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या तर सहा ठिकाणी शार्ट सर्किटच्या घटना घडल्या. मात्र त्यात काेणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाने दिली.

  तलाव क्षेत्रात पाऊस

  पावसाने पाठ फिरविलेल्या तलावांच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाने पुन्हा सुरूवात केली असून मुंबईला पाणी पुरविणार्या तलावांमध्ये पाण्याच्या पातळीत लक्षणिय वाढ हाेत आहे, ही समाधानाची बाब असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.

  विश्रांती घेतलेला पावसाने राज्यातील अनेक भागसह मुंबईत पुन्हा सक्रिय झाला आहे. आज दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमधील दादर, सायन, लोअर परेल, कुलाबा, लालबाग, शिवडी या भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. दादर येथील हिंदमाता, वरळी, सायन या भागात पाणी साचल्यामुले नगरिकाचे बरेच हाल झाले. तर अनेकांना पाण्यातून वाट काढावी लागली.

  दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यामुळे, बऱ्यापैकी लोक आता घराबाहेर पडले पडले आहेत, त्यामुळे आज कार्यालय गाठण्यासाठी लोकांची धावपळ होत असताना, अचानक पडलेल्या पावसाने सुद्धा तारांबळ उडवली. महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आज सर्वत्र पाऊस असणार अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर परवापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार आहे.
  मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.