rain

कोकण, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १८ ते २४ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात रायगड. सिंधुदूर्ग आणि पालघर जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सात दिवस संपूर्ण राज्यात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई : राज्यात पुढील ७ दिवसांत पावसाचा (Rain) जोर वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, (Kokan) पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात ( weather department forecast) आली आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे. तसेच राज्यातील काही भागांत पाऊस सक्रीय आहे. परंतु महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरांत पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पण येणाऱ्या काही दिवसांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.