पावसाची दडी, तापमानात वाढ; मुंबईकर उकाड्याने हैराण

मुंबईत मान्सनचे आगमन केव्हाच झाले आहे. ९ जूनला शहरात पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला चांगला पाऊस झाला, मात्र गेल्या एका आठवड्यापासून मान्सून थांबला आहे. सोबतच दिवसा आणि रात्र तापमानात वाढ होत आहे. रविवारी मुंबई शहर, उपनगरांचे कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. पाऊस थांबल्याने तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

    मुंबई : मुंबईत तसे पाहिले तर पावसाळा सुरू आहे, पंरतु, काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या ६ ते ७ दिवसांनंतर मुंबई पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभर तरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.

    मुंबईत मान्सनचे आगमन केव्हाच झाले आहे. ९ जूनला शहरात पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला चांगला पाऊस झाला, मात्र गेल्या एका आठवड्यापासून मान्सून थांबला आहे. सोबतच दिवसा आणि रात्र तापमानात वाढ होत आहे. रविवारी मुंबई शहर, उपनगरांचे कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. पाऊस थांबल्याने तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

    हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले की, उत्तर पूर्वेकडे सरकलेली ट्रफ लाईन पुन्हा खालच्या दिशेला सरकणार आहे. १० जुलैनंतर राज्यातील काही भागात पावसाला पुन्हा सुरूवात होईल. मुंबईत १४ ते १९ जुलैदरम्यान चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.