पावसाची दाणादाण; पाणी कपातीची मुंबईकरांवर टांगती तलवार 

गेल्या चाेवीस तासात शहर भागात 33.79 मिलीमीटर, पूर्व उपनगरे 56.26 तर पश्चिम उपनगरात 52.33 मिलीमीटर इतक्या पावसाची नाेंद झाली. आज दुपारी साडेचारच्या सुमारास समुद्राला माेठी भरती हाेती. मात्र भरतीच्या काळात अतिवृष्टी न झाल्याने भरतीचा परिणाम जाणवला नाही. पाच ठिकाणी घराच्या भिंतीचा भाग पडण्याच्या घटना मुंबईत घडल्या तर सहा ठिकाणी शार्ट सर्किटच्या घटना घडल्या, मात्र त्या किरकाेळ हाेत्या. पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या 16 तक्रारी पालिकेच्या आपत्कालिन विभागाकडे आल्या.

    मुंबई : मुंबईत आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. दक्षिण मुंबईच्या काही भागात उन पावसाचा खेळ सुरू हाेता. पावसामुळे काही ठिकाणी किरकाेळ पडझड झाली. मात्र त्यात काेणतीही जीवित हानी झाली नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाचा आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम जाणवला. मध्य रेल्वेच्या जलद ला्ेकल उशीराने धावत हाेत्या. त्याचा प्रवाशांना त्रास झाला.

    गेल्या चाेवीस तासात शहर भागात 33.79 मिलीमीटर, पूर्व उपनगरे 56.26 तर पश्चिम उपनगरात 52.33 मिलीमीटर इतक्या पावसाची नाेंद झाली. आज दुपारी साडेचारच्या सुमारास समुद्राला माेठी भरती हाेती. मात्र भरतीच्या काळात अतिवृष्टी न झाल्याने भरतीचा परिणाम जाणवला नाही. पाच ठिकाणी घराच्या भिंतीचा भाग पडण्याच्या घटना मुंबईत घडल्या तर सहा ठिकाणी शार्ट सर्किटच्या घटना घडल्या, मात्र त्या किरकाेळ हाेत्या. पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या 16 तक्रारी पालिकेच्या आपत्कालिन विभागाकडे आल्या.

    मुंबईत दिवसभर पावसाची रिपरिप हाेती. त्याचा उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम जाणवला नाही. मात्र कालच्या जाेरदार पावसाने काेलमडलेले मध्य आणि हार्बर रेल्वेचे वेळापत्रक आजही सुरळीत झाले नव्हते. जलद लाेकल उशीराने धावत हाेत्या. त्याचा रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

    मुंबईला पाणी पुरविणार्या तलावांच्या पाणलाेट क्षेत्रात आजही रिमझिम पाऊस हाेता. जुलै महिना निम्मा झाला तरी अजूनही तलाव क्षेत्राकडे पाऊस फिरकलेला नाही. परिणामी पाणी कपातीची मुंबईकरांवर टांगती तलवार आहे.