Rains shake Mumbai; 25 killed in one night

शनिवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेऊन मध्यरात्री जोरदार कोसळायला सुरुवात केली. तीन ते चारतास धो- धो कोसळलेल्या या पावसाची काळरात्र ठरली. चेंबूर- वाशीनाका येथील न्य़ू भारत नगर वंजार दांडा येथे डोंगर उतारावर काही झोपड्या वसल्या आहेत. दरवर्षी मुसळधार पावसांत येथील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहतात. डोंगराच्या भयाखाली असलेल्या या झोपड्यांचा परिसर बीआरसीच्या हद्दीत येतो. मुसळधार पावसांत दरड कोळण्याची भिती असल्याने येथे संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून संरक्षक भिंतीला काही ठिकाणी छिद्रे ठेवण्यात आली होती. रात्री - साडेबारानंतर पावसाचा जोर वाढू लागला. धो धो पावसामुळे डोंगरावरील माती पाण्यासह खाली घसरायला लागली.

  मुंबई : मुंबईत मध्यरात्री मुसळधार पावसाने कोसळलेल्या दरडींमुळे २४ जणांचा मृत्यू झाला. दृदय हेलावून सोडणा-या या घटनांत चेंबूरमध्ये 16 जणांचा, विक्रोळीत 8 तर भांडुपमध्य़े एकाचा मृत्यू झाला. एका रात्रीत घडलेल्या या घटनांनी अवघी मुंबई हादरली आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची तर केंद्र सरकारने 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

  मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या भारतनगरमधील डोंगर उतारावरील संरक्षक भिंत पाण्याच्या दाबाने काही झोपड्यांवर कोसळून १८ जण ढिगा-याखाली गाडले गेले. यात एकाच घरातील पाच जणांचा समावेश आहे. रात्रीच्या अंधारातील आर्त किंचाळ्या, ढिगा-याखाली विव्हळणारे जीव काळीज पिळवटणारे होते. या दुर्घटनांनंतर डोंगराच्या भयाखाली असलेल्या झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  शनिवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेऊन मध्यरात्री जोरदार कोसळायला सुरुवात केली. तीन ते चारतास धो- धो कोसळलेल्या या पावसाची काळरात्र ठरली. चेंबूर- वाशीनाका येथील न्य़ू भारत नगर वंजार दांडा येथे डोंगर उतारावर काही झोपड्या वसल्या आहेत. दरवर्षी मुसळधार पावसांत येथील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहतात. डोंगराच्या भयाखाली असलेल्या या झोपड्यांचा परिसर बीआरसीच्या हद्दीत येतो. मुसळधार पावसांत दरड कोळण्याची भिती असल्याने येथे संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून संरक्षक भिंतीला काही ठिकाणी छिद्रे ठेवण्यात आली होती. रात्री – साडेबारानंतर पावसाचा जोर वाढू लागला. धो धो पावसामुळे डोंगरावरील माती पाण्यासह खाली घसरायला लागली.

  बांबू, पत्र्यांनी डोंगराला चिकटून उभारलेल्या झोपड्यांतील रहिवासी जोरदार पावसाच्या तडाख्याने हादरले असतानाच रात्री पावणे एकच्या सुमारास जोरदार आवाज झाला आणि काही क्षणातच संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळून ढिगा-याखाली गेली. पाऊस कोसळत राहिल्याने पाण्याचा दाब संरक्षक भिंतीवर येऊन झोपड्यांवर कोसळल्याने काही झोपड्या ढिगा-याखाली गेल्या आणि होत्याचं नव्हतं झालं. ढिगा-या खाली १८ जण गाडले गेले. थरकाव उडवणा-या या घटनेने बाजूच्या झोपड्यांतील रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारातील किंचाळ्या काळीज पिळवटणा-या होत्या.

  अग्निशमन दलासह एनडीआरएफ घटनास्थळी येऊन बचावकार्य सुरु केले. १८ जणांचे मृतदेह ढिगा-य़ाखालून बाहेर काढले. यात एकाच कुटुंबातील आई वडीलांसह दोन मुलींचा जीव गेला. तर दोन जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेसह विक्रोळीत दरड कोसळून पाच जणांचा व भांडुपमध्ये वनविभागाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. एका रात्रीत तीन ठिकाणच्य़ा या दुर्घटनांनी मुंबई हादरून गेली.

  चेंबूर येथील दुर्घटनेतील मृतांची नावे –

  १) मीना झिमुर ( ४५)
  २) पंडित गोरे (५०)
  ३) शीला पारधे (४०)
  ४) शुभम पारधे (१०)
  ५) श्रुती पारधे (१५)
  ६) मुकेश आग्रहरी (२५)
  ७) जिजाबाई तिवारी (५४)
  ८) पल्लवी दुपारगडे (४४)
  ९) खुशी ठाकूर (२ वर्षं)
  १०) सुर्यकांत झिमुर ( ४७)
  ११) उर्मिला ठाकूर (३२)
  १२) छाया गोरसे (४७)
  १३) अपेक्षा झिमुर (२०)
  १४) प्राची गोरे ( १५)
  १५) २६ वर्षीय ओळख पटलेली नाही
  १६) २५ वर्षीय ओळख पटलेली नाही

  जखमींची नावे

  १) विशाखा गंगावणे (१५)
  २) लक्ष्मी गंगावणे (४०)
  ३) अक्षय झिमुर (२६)
  ४) विजय खरात (४०)
  ५) संजय गायकवाड (४०)

  विक्रोळी येथील दुर्घटनेतील मृतांची नावे

  (१) अनिकेत रमाकांत तिवारी (२३)
  (२) रामनाथ राजनाथ तिवारी (४५)
  (३) आशिष विश्वकर्मा (१९)
  (४) प्रिन्स हंसराज विश्वकर्मा (११)
  (५) कविता रामनाथ तिवारी (४२)
  (६) कल्पना जाधव (३५)
  (७) साहेबराव जाधव (४४)

  भांडुप येथे सोहम महादेव थोरात (१६)यींचा मृत्यू झाला आहे.