months worth rain just twelve hours mumbaikars have suffered

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई व उपनगरांत अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मंगळवारी सकाळपासून पावसाने उघडीप केली होती. संध्याकाळी मात्र आकाशात काळे ढग जमा होऊन विजांच्या कड़कडाटासह पावसाने जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. तास - दीड तास पडलेल्या पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. त्यामुळे कामावरून घरी परतणा-या प्रवाशांची तारांबळ उडाली.

    मुंबई : मुंबईत सकाळी उघडीप केलेल्या पावसाने संध्याकाळी दमदार हजेरी लावत जोरदार तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणा-य़ा मुंबईकरांची तारांबळ उडाली. काही काही ठिकाणी रस्ते वाहतूक जॅम झाली असली तरी रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत होती. येत्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून मुंबई व उपनगरांत अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मंगळवारी सकाळपासून पावसाने उघडीप केली होती. संध्याकाळी मात्र आकाशात काळे ढग जमा होऊन विजांच्या कड़कडाटासह पावसाने जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. तास – दीड तास पडलेल्या पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. त्यामुळे कामावरून घरी परतणा-या प्रवाशांची तारांबळ उडाली.

    रेल्वे, बस पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ उडाली. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. मात्र पावसाची उघडीप झाल्याने काही वेळातच पाण्याचा निचरा झाला. रस्ते वाहतूक जॅम झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत होती.