Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टी म्हणते मी माझ्या कामात Busy, राज कुंद्रा काय करतोय हे मला काय माहित

शिल्पाच्या जबाबानुसार, राज कुंद्रांनी २०१५ मध्ये वियान इंडस्ट्री कंपनी सुरू केली, त्यांच्याकडे या कंपनीमध्ये २४.५० टक्के शेअर्स होते. या कंपनीमध्ये ती एप्रिल २०१५ ते जुलै २०२० पर्यंत संचालक पदावर होती, त्यानंतर तिने वैयक्तिक कारणांमुळे हे पद सोडले. तसेच आपल्याला हॉटशॉट आणि बॉलीफेम बद्दल काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने राज कुंद्रा काय करत होते हे आपल्याला माहित नसल्याचे शिल्पाने नमूद केले आहे.

    मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात(Raj Kundra Pornography Case) अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्राने मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याचाच आधार घेत कुंद्रा दंडाधिकारी न्यायालयात नव्याने जामीनासाठी याचिका दाखल करणार आहे. या आरोपपत्रात राज कुंद्राची(Raj Kundra) पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही(Shilpa Shetty) साक्षीदार बनवण्यात आले आहे.

    शिल्पाच्या जबाबानुसार, राज कुंद्रांनी २०१५ मध्ये वियान इंडस्ट्री कंपनी सुरू केली, त्यांच्याकडे या कंपनीमध्ये २४.५० टक्के शेअर्स होते. या कंपनीमध्ये ती एप्रिल २०१५ ते जुलै २०२० पर्यंत संचालक पदावर होती, त्यानंतर तिने वैयक्तिक कारणांमुळे हे पद सोडले. तसेच आपल्याला हॉटशॉट आणि बॉलीफेम बद्दल काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने राज कुंद्रा काय करत होते हे आपल्याला माहित नसल्याचे शिल्पाने नमूद केले आहे.

    पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटकेनंतर तुरूंगात असलेल्या राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसांनी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात उद्योगपती राज कुंद्रासह अन्य दोघांवर सुमारे दिड हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यात राज कुंद्राचा नातलग प्रदीप बक्षी आणि एक अन्य आरोपी यश ठाकूर यांचा समावेश आहे. या सर्वांवर पिडीत मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी आरोप लावले आहेत.

    या पुरवणी आरोपपत्रात कुंद्राच्या मोबाईलमधील इतर आरोपींसोबतचे संदेश लैपटॉपमध्ये सापडलेल्या ६० हुन अधिक अश्लील व्हिडीओ क्लिप पोलिसांनी सोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनेक आरोप पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात ठेवले आहेत. तसेच राज कुंद्रा फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंत आर्म्स प्राइममध्ये संचालक होते. तेव्हा, हॉटशॉटमधून उत्पन्न झालेला महसूल आणि पैसे केनरिन कंपनीच्या लॉयन्स बँक ऑफ जमा केले होते. प्रदीप बक्षी हे लंडनमधील केनरिन कंपनीचे संचालक होते. आरोपी, साक्षीदारांचे जबाब आणि ईमेल आणि संगणकावरून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत गूगलकडून २०,२४,७७४ रुपये मिळाले, दुसरीकडे, अँपलकडून ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०२० पर्यंत १,१६,५८, ९२५ रुपये मिळाले असल्याचे आरोपत्रत नमूद करण्यात आले आहे.