…म्हणून राज ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटता आले नाही; विधाभवनाकडे निघालेेले राज ठाकरे परत फिरले

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विधान भवनात (Maharashtra Vidhan Bhawan) येणार होते. विधान भवनात येणाऱ्यांना कोविड 19 (Covid19) संसर्ग RTPCR चाचणी करणं बंधनकारक आहे. मात्र, राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही. तसेच मी मास्क लावत असे राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, मास्क नसेल तर विधानभवनात प्रवेश दिला जात नाही. या सर्व कारणांमुळे राज ठाकरे माघारी फिरल्याची चर्चा आहे.

    मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्लान फसला आहे. विधानभवनाजवळ जाऊनही राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही. राज ठाकरेंना अर्ध्या रस्त्यातूनच परत फिरावे लागले.

    राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विधान भवनात (Maharashtra Vidhan Bhawan) येणार होते. विधान भवनात येणाऱ्यांना कोविड 19 (Covid19) संसर्ग RTPCR चाचणी करणं बंधनकारक आहे. मात्र, राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही. तसेच मी मास्क लावत असे राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, मास्क नसेल तर विधानभवनात प्रवेश दिला जात नाही. या सर्व कारणांमुळे राज ठाकरे माघारी फिरल्याची चर्चा आहे.

    वीजबिल आणि अन्य प्रश्नांबाबत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. ते निघालेही होते. मात्र, विधाभवनात प्रवेशासाठी असलेल्या अटींबद्दल त्यांना कळाले तेव्हा त्यांनी भेटण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि ते परत फिरले.