राज ठाकरेंना दुखापत ; हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर

मुंबई  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे यांना काल संध्याकाळी टेनिस खेळताना डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. ही दुखापत किरकोळ स्वरूपाची आहे मात्र त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. राज यांच्या डाव्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावले आहे.

स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी राज ठाकरे यांनी हल्ली नियमितपणे लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. ‘कृष्णकुंज’ समोरच्या शिवाजी पार्क जिमखान्यात दररोज संध्याकाळी हजेरी लावून राज ठाकरे सध्या लॉन टेनिस खेळाचा मनमुराद आनंद घेतात. यापूर्वीही त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोला त्रास होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी निवडणुक प्रचारात त्यांनी बँन्डेज लावून प्रचार केला होता.