डिसले गुरुजींचे ‘मनसे’ कौतुक; राज ठाकरे म्हणाले…

मुंबई : सात कोटी रूपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील डिसले गुरुजींचे कौतुक केले आहे.

ट्विटरवर णजितसिंह डिसले यांचा फोटो शेअर करत राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी डिसले यांचे अभिनंदनही केले आहे.

युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला.  तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय. अस ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.