Raj Thackeray orders MNS to fight for Gram Panchayat elections

जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि आता मनसेनेही आपली कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे हे नक्कीच.

मुंबई : राज्यात आता ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat elections) बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. कोरोना (Corona) काळामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत. पुढील महिन्यात या निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मनसेनेही (MNS) जोरदार तयारी केली आहे.

जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि आता मनसेनेही आपली कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे हे नक्कीच. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी या निवडणुका पुर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यंदाच्या निवडणुकांमध्ये राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत होणार होत्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींचीही यामध्ये निवडणुक होणार आहे. या निवडणुका १५ जानेवारीला होणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी उमेद्वाराला २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तसेच प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारीला होणार आहे. तसेच याची १८ जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

१५ डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील

२३ ते ३०डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी

३१ डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी

४ जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी

१५जानेवारी मतदान

१८ जानेवारी मतमोजणी