Raj Thackeray preparing for big decision; Important responsibility to be handed over to Amit Thackeray?

महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आहे. यासाठी रणनिती आखण्यासाठी मुंबईत मनसेची बैठक सुरु आहे. राज ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून अमित ठाकरेंवर महत्वाची जबाबदारी सोपवणार असल्याची चर्चा सुरु आहे.

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आहे. यासाठी रणनिती आखण्यासाठी मुंबईत मनसेची बैठक सुरु आहे. राज ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून अमित ठाकरेंवर महत्वाची जबाबदारी सोपवणार असल्याची चर्चा सुरु आहे.

वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेचे महत्वाची बैठक सुरु आहे. यावेळी झालेल्या चर्चेत अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

नवा झेंडा आणि नव्या अजेंड्यासह मनसेचे रिलाँचिंग करतेवेळी अमित ठाकरे पहिल्यांदाच मनसेच्या व्यासपीठावर सक्रिय दिसून आले होते. यावेळी अमित यांची राजकारणात एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर ते फारसे काही सक्रिय दिसले नाहीत.

मात्र, मागील काही महिन्यांपासून विविध कार्यक्रमात अमित ठाकरे यांची उपस्थिती पहायला मिळत आहेत. नवी मुंबईसह अनेक ठिकाणच्या कार्यकर्माला ते आवर्जून हजेरी लावत आहेत.

आता महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने त्यांच्यावर थेटपणे एखादी जबाबदारी टाकली जाण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची परिक्षा देखील घेता येणार आहे.