raj thakre

परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय ,कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन धालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.

  राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. हे महाराष्ट्रातच का दिसत आहे यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे परप्रांतीय लोक आहेत. आणि त्या राज्यांमध्ये करोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत,’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरच्या राज्यातून येणारी लोकं जबाबदार असल्याचं सांगितले. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी विवध मुद्द्यांवर भाष्य केले

  “काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक कोरोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

  “परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय ,कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन धालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.

  -शाळांची फी निम्मी करा.
  “शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा,” अशा मागण्या केली असल्याची माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली.

  -१०० कोटी रुपयांबाबत साक्षात्कार परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर कसा झाला
  . अंबानी यांच्या निवास्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या भरलेली गाडी ठेवल्याच्या प्रकरणातही असेच घडताना दिसत आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला हा विषय महत्त्वाचा नाही तर अंबानी यांच्या निवास्थानाजवळ पोलिसांनी जिलेटीनच्या कांड्या भरुन गाडी नेमकी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली? हा विषय महत्त्वाचा आहे. परमबीर सिंह यांना मंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर १०० कोटी रुपयांबाबत साक्षात्कार झाला. त्यांना तो आधी का झाला नाही. जर त्यांना पदावरुन हटवले असते तर ते हे बोलले असते का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला.

  लोकांनी हप्ते कसे भरायचे
  अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँका चालण्यासाठी त्यांच्याकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकेत जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३०एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.