Raj Thackeray should go for party growth, Chandrakant Patil's advice to MNS

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, मनसेचा महापालिका निवडणुकीत किती परिणाम होऊ शकतो हे सांगता येईल. परंतु ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा काय परिणाम होईल हे सांगता येणार नाही.

मुंबई : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचे( Gram Panchayat elections) वारे वाहत आहे. ग्रामपंचायत निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस आणि मनसेही (mns) रिंगणात उतरली आहे. राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil)  यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पक्षाची वाढ करण्यासाठी राज्यात फिरले पाहिजे असा सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, मनसेचा महापालिका निवडणुकीत किती परिणाम होऊ शकतो हे सांगता येईल. परंतु ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा काय परिणाम होईल हे सांगता येणार नाही. परंतु राज ठाकरेंना माझी सूचना आहे की, त्यांनी पक्षवाढीसाठी फिरले पाहिजे. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढल्यास आपल्यासोबत किती जनाधार मिळतो हे कळते. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. मनसेसोबत युती करणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप आमदारांची काल ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अडचणी समजून घेतल्या आणि काही सूचना देण्यात आल्या आहेत. आणि भाजप ही ग्रामपंचायत निवडणुक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.