सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य, पण..; विरार दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. असं राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे. 

    नाशिकमधील रूग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन २४ रूग्णांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आज पुन्हा एकदा  विरारमध्ये रूग्णालयात आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या दुर्दैवी आणि क्लेशदायक घडणाऱ्या घटनांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

    आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. असं राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

    सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. अशी  मागणी राज ठाकरेंनी केली आहे.