राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्ला बोल, आदेशांना झुगारुन मंदिर प्रवेश करण्यााचा दिला इशारा

सरकारने मंदिर सगळ्यात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पावलं उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण आशा करतो की ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही, अशा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु अनलॉक प्रक्रियेमध्ये अनेक बाबींमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. (warning to enter the temple in defiance of orders) राज्य सरकारने मॉल, दुकाने, सार्वजनिक कार्यक्रमांमधील सदस्यांची उपस्थिती यामध्ये शिथिलता दिली आहे. परंतु धार्ममिक स्थळे अद्याप सुरु करण्यास परवानगी दिली नाही आहे. यावरुन राज ठाकरेंनी राज्य सरकारवर पत्राद्वारे टीका केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray’) यांनी लवकरात लवकर मंदिर सुरु करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. असे केले नाहीतर सरकारच्या आदेशांना झुगारुन मंदिर प्रवेश करावा लागेल, अशा इशाराच त्यांनी पत्रातून दिला आहे. (warning to enter the temple in defiance of orders)

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीचं झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांना सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाही आहे. असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

तसेच ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु केले आहेत. मॉल्स उघडले जात आहेत. तर सार्वजनिक कार्यक्रमांना १०० लोकांची उपस्थिती ठेवली आहे. तर दुसरीकडे भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरु आहे. अस का? राज्य सरकारला मंदिरस उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा देखील प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.