राज ठाकरेंच्या ‘कूल लूक’ची सर्वत्र चर्चा

मुंबई :संपूर्ण राज्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांबाबत नेहमी जोरदार चर्चा होत असते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्य हिट झालं होतं. त्यांची सभा त्यातील त्यांचे डायलॉग्ज नेहमी चर्चेचे विषय असतात. मात्र यावेळी राज ठाकरे एका वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत आले असून चर्चेचा विषय आहे त्यांचा हटके लुक! डोळ्यांवर गॉगल, पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज आणि टीशर्ट-जीन्स अशा लूकमधला त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर अनेक लाइक्स मिळवत आहे.

बहुतेक वेळा कुर्ता पायजमा अशा वेशभूषेत दिसणारे राज ठाकरे अशा वेगळ्या लूकमध्ये जास्त ‘कूल’ वाटत आहेत अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या फोटोवर तरुण चाहत्यांनी दिल्या आहेत .तर काहींनी हा लूक After Lockdown लुक असल्याचे म्हटले आहे.