राज ठाकरेंचा आज वाढदिवस, शिवसेनेची स्पेस मनसे घेणार का, आगामी निवडणुकांत होणार लिटमस टेस्ट

राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक ठळक आणि महत्त्वाचं नाव. राज ठाकरेंचा आज (सोमवार) आज वाढदिवस. यानिमित्त महाराष्ट्रातून आणि देशभरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात महाआघाडीचा प्रयोग झाल्यानंतर मनसेच्या राजकारणाचे संदर्भ बदलले असल्यामुळे आता राज ठाकरे आगामी निवडणुकांमध्ये काय रणनिती आखणार, याची प्रचंड उत्सुकता आहे.

  राज ठाकरेंचा वाढदिवस आहे, अमोल त्यांच्यावर एक बातमी करावी. मुंबई मनपा निवडणुकांत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा प्रभाव, प्रयत्न. ते शिवसेनेसोबत जाणार, भाजपसोबत, स्वतंत्र लढणार का, हिंदुत्त्व आणि मराठीच्या मुद्द्यावर पुढे काय, अशी मोघम मांडणी, त्यांचा करिष्मा अशी करा

  राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक ठळक आणि महत्त्वाचं नाव. राज ठाकरेंचा आज (सोमवार) आज वाढदिवस. यानिमित्त महाराष्ट्रातून आणि देशभरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात महाआघाडीचा प्रयोग झाल्यानंतर मनसेच्या राजकारणाचे संदर्भ बदलले असल्यामुळे आता राज ठाकरे आगामी निवडणुकांमध्ये काय रणनिती आखणार, याची प्रचंड उत्सुकता आहे.

  शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेनं आपला हिंदुत्ववाद आवरता घेऊन पुरोगामित्वाच्या तत्त्वज्ञानावर राजकारण सुरु ठेवलंय. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेनं रिकामी केलेली ‘स्पेस’ भरण्याचा प्रयत्न करत राज ठाकरेंनी त्यांचं धोरण मराठीवरून हिंदुत्वाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं गेल्या काही दिवसांतील घटनांमधून स्पष्ट होतंय.

  आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो, ही मनसेच्या नव्या अवताराची पहिली लिटमस टेस्ट असणार आहे. शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये मनसेला चांगलाच प्रतिसाद मिळेल, असा अंदाज पुढं आल्यामुळे शिवसेनेच्या गोटातही खळबळ उडाल्याची माहिती पुढे आली होती. शिवसेनेची पारंपारिक स्पेस काबीज करण्यात मनसेला कितपत यश मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

  स्थापनेनंतर पाच वर्षं मनसेचा जोरदार प्रभाव महाराष्ट्रात राहिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून विधानसभेपर्यंत जोरदार यश मिळालं. मात्र त्यानंतर हा आलेख उतरणीला लागला आणि केवळ १ आमदार निवडून येण्यापर्यंत राजकीय उतरण मनसेला अनुभवावी लागली. त्यामागे सातत्य नसणे, शहरी भागापलिकडे ग्रामीण भागात विस्तार न होणे आणि निवडणुकांव्यतिरिक्त इतर वेळी पक्षातलं चैतन्य कमी होणे, अशी कारणं राजकीय विश्लेषकांनी मांडली.

  राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतील का, यावर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं. देवाच्या मनात असेल, तर तसंही होऊ शकेल, असं उत्तर त्यांनी दिलं होतं. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत हा चमत्कार होऊ शकेल का, याची चर्चा सुरु झालीय. आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढेल आणि स्वतःची ताकद आजमावेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय.

  मनसेची सध्याची अवस्था एकखांबी तंबूसारखी आहे. राज ठाकरे हे करिश्मा असणारे आणि प्रभावी नेते आहेत. मात्र त्याव्यतिरिक्त पूर्ण राज्यभर प्रभाव असणारा नेता मनसेकडे नाही. दुसरं म्हणजे राज ठाकरे यांच्यावर सकाळी लवकर न उठण्यापासून ते सतत भूमिका बदलत राहण्यापर्यंत अनेक टीका विरोधकांकडून होत आहेत. आता मराठीच्या मुद्द्यावरून जन्माला आलेली ही संघटना पुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक जोर देते की पुन्हा मराठीच्याच मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करते,यावरही या पक्षाचं भवितव्य ठरणार आहे. सध्या तरी बदललेल्या भूमिकेची पहिली लिटमस टेस्ट घेण्याच्या तयारीत मनसे व्यस्त असल्याचं चित्र आहे.