येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दोन्ही लसी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज तयार होत असतात. त्याशिवाय जर तुम्ही अँटीबॉडीज चेक केल्या असतील आणि शरीरात जर भरपूर अँटीबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला कुठलाही काही प्रॉब्लेम नसतो. पण शास्त्रीय पद्धतीने लस घेणाऱ्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे ही महत्त्वाची गरज आहे, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

    मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूंच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. सध्या राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे. मात्र, राज्यात लसीचा कमी प्रमाणात तुटवडा उपलब्ध आहे. त्यामुळे लस उपलब्ध होत नाहीये. याबाबत स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा झाली आहे. येत्या जुलै ते ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून व्हॅक्सीन इंपोर्टचं एक स्पष्ट धोरण ठरवावं. तसेच याला इतर राज्यांना मदत करावी. तसेच ज्यांनी दोन लस घेतल्या असतील तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.

    दोन्ही लसी घेतल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने नियम पाळणे आवश्यक