भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव (congress leader rajiv satav) यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव (congress leader rajiv satav) यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राजीव सातव
एकनाथ खडसे यांचा भाजपच्या राजीनाम्यातून भाजपची कार्यशैली उघड झाली आहे. अभी तो ये शुरूवात है. ट्रेलर शुरू हुआ है, पिक्चर तो अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया राजीव सातव यांनी व्यक्त केली आहे. पूरग्रस्तांना तातडीने मदत करा. राज्यात पूरस्थिती फार बिकट आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही सातव यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, अशी आमची आग्रही मागणी आहे, असं सांगतानाच केंद्र सरकारकडे जीएसटीचे पैसे थकलेले आहेत. हे राज्याच्या हक्काचे पैसे होते. त्यामुळे केंद्राने राज्याचे हे पैसे लवकरात लवकर द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचा पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात नव्हे तर उजेडात होईल, असं जयंत पाटील म्हणाले.