pravin darekar

भाजप विधानपरिषद पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर खडसून टीका केली आहे. राजू शेट्टी कोणत्या जगात वावरत आहेत? शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची शेतकरी नेता म्हणून असलेली ओळख केव्हाच पुसली गेली आहे. ते आता शेतकरी नेते राहिले नाहीत. त्यांना राजकारणात जास्त रस आहे. असे भाजप विधान परिषदेचे पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

भाजप विधानपरिषद पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर खडसून टीका केली आहे. राजू शेट्टी कोणत्या जगात वावरत आहेत? शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे असेही प्रविण दरेकर म्हणाले.

राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. सत्य स्वीकारण्याचे धाडस राजू शेट्टी यांच्यात नाही. राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी हेच आहे. यासाठी आता राजू शेट्टी काय करतात, हे पाहावे लागेल, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.