राकेश वाधवान यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

मुंबई: पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवान यांना आज विशेष न्यायालयाने अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. राकेश वाधवान यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या

मुंबई: पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवान यांना आज विशेष न्यायालयाने अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. राकेश वाधवान यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जामीन मागितला होता. त्यांच्यावर मनी लॉन्डिंग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष पीएमएलए न्यायाधीश पी. पी. राजवैद्य यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या जामीन अर्जात वाधवान यांनी वाढते वय आणि आजारपणाचे कारण पुढे केले होते. तसेच कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली होती. एचडीआयएलचे राकेश वाधवान आमि त्यांचा मुलगा सारंग गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये समोर आलेल्या पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत. यासंदर्भात तपास सुरु आहे. मुंबई पोलीसांची गुन्हे शाखा आणि ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.