राकेश वाधवान यांचा केईएम रुग्णालयात मुक्त संचार; उच्च न्यायालयात याचिका

पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेत सुमारे ६ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राकेश वाधवान आणि धीरज वाधवान यांनी विशेष अधिकारात पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तिथे त्यांराकेश यांनी कार्यालयीन काम सुरू ठेवल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

    मुंबई : पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेत सुमारे ६ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राकेश वाधवान आणि धीरज वाधवान यांनी विशेष अधिकारात पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तिथे त्यांराकेश यांनी कार्यालयीन काम सुरू ठेवल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

    पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएलचे प्रमोटर्स धीरज आणि राकेश वाधवान यांना २०१९ मध्ये अटक केली. राकेश वाधवान एप्रिल महिन्यापासून केईएम रुग्णालयात दाखल आहेत. केईएम रुग्णालयात ११ व्या मजल्यावर राकेश वाधवान कामाशी निगडित कागदपत्रांवर सही करत असल्याचे आपल्याला आढळून आले असून तिथे त्यांनी आपले छोटेखानी कार्यालय थाटले असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका अ‍ॅड. ईराम सय्यद यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हीसी मार्फत सुनावणी पार पडली.

    तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. तसे असले तरीही त्यांना विलाविकरण कक्षात दाखल का करण्यात आले नाही. राकेश रुग्णालयात मुक्त संचार कसा करत होते असे सवाल उपस्थित करत त्यासंदर्भात आपल्याकडे चित्रफितही असल्याचा दावा अ‍ॅड. सय्यद यांनी केला आहे.

    त्यांचा युक्तिवाद ऐकून घेत केईएम रुग्णालयासह राकेश आणि धीरज वाधवान यांना या प्रकरणी प्रतिवादी करण्याचे निर्देश देत त्यासोबतच राकेशचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यास पालिकेला बजावत खंडपीठाने सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली.