‘सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, होऊन जाऊ दे दूध का दूध पानी का पानी’

सचिन वाझे यांना शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे.

    मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्या प्रकरणी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझे यांना शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे.

    सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी, असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.