सनराईज हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीची सखोल चौकशी करा, रामदास आठवलेंची मागणी

भांडुपच्या(bhandup) ड्रीम मॉल मधील सनराईज हॉस्पिटलमध्ये(fire at sunrise hospital) लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा नाहक जीव गेला. या अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले(ramdas athavale) यांनी केली आहे.

  मुंबईः भांडुपच्या(bhandup) ड्रीम मॉल मधील सनराईज हॉस्पिटलमध्ये(fire at sunrise hospital) लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा नाहक जीव गेला. या अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale)यांनी केली आहे. या अग्निकांडात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने जाहीर केलेला प्रत्येकी ५ लाखांचा निधी अल्प असून त्यात वाढ करून १० लाख रुपये निधी द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

  आठवले यांनी हॉस्पिटलला दिली भेट
  अग्निकांडाची माहिती मिळताच आठवले यांनी भांडुपच्या आग लागलेल्या सनराईझ हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी आठवले यांना घडलेल्या अग्निकांडाची माहिती दिली.

  सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे
  ड्रीम मॉल या तीन मजली इमारतीमधील सन राईझ हॉस्पिटलला काल मध्यरात्री आग लागली. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या ड्रीम मॉल इमारतीला ओसी नव्हती तरीही येथे कोविड रुग्णालयाला परवानगी कशी देण्यात आली. भंडारा जिल्हा रुग्णायलयात अग्निकांड होऊन नवजात बालके मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेच्या आठवणी अजून ताज्या असून मुंबईत अद्याप रुग्णायलयांचे फायर ऑडिट झाले नाही. मुंबई मनपा आणि राज्य शासन जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

  या अग्निकांडाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी. पुन्हा अशी अग्निकांडाची घटना घडू यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे. या अग्निकांडात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने जाहीर केलेला प्रत्येकी ५ लाखांचा निधी अल्प असून त्यात वाढ करून १० लाख रुपये निधी द्यावा.