विधान परिषदेची १ जागा रिपब्लिकन पक्षाला द्या – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यातील ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. भाजपला जिंकता येणाऱ्या ४ जागांपैकी १ जागा भाजपने रिपब्लिकन

 मुंबई: महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यातील ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. भाजपला जिंकता येणाऱ्या ४ जागांपैकी १ जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्यावी, अशी मागणी आज रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविले आहे. त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे आठवले चर्चा करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेची एक जागा देऊन सामाजिक समतोल साधावा. रिपाइंला विधान परिषदेची एक जागा दिल्यास त्यातुन   राज्यातील आंबेडकरी जनतेला ताकद देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यातून चांगला सामाजिक संदेश जाईल. त्याची  पुढील काळात भाजपला ही चांगली मदत होईल असे सांगत रामदास आठवले यांनी भाजप चे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आरपीआय ला एक विधान परिषदेची जागा देण्याची मागणी केली आहे.