आत्मनिर्भर भारत अभियान अर्थव्यस्थेला नवसंजीवनी देणारे ठरेल – रामदास आठवले

मुंबई: कोरोना महासंकटाच्या काळात अर्थव्यवस्थेचा कणा मोडू नये तर अधिक मजबूत व्हावा या दूरदृष्टीच्या विचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करून २० लाख कोटी

मुंबई: कोरोना महासंकटाच्या काळात अर्थव्यवस्थेचा कणा मोडू नये तर अधिक मजबूत व्हावा या  दूरदृष्टीच्या विचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करून २० लाख कोटी रुपयांच्या जाहीर केलेल्या महापॅकेजचे जनता स्वागत करीत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात आत्मनिर्भर भारत अभियान हे महापॅकेज अर्थव्यवस्थेला; उद्योग जगताला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या महापॅकेजचे स्वागत केले आहे. 

आत्मनिर्भर भारत अभियान महापॅकेज लघु सूक्ष्म मध्यम उद्योगांना; कुटीर उद्योगांना; व्यापारी वर्गाला ; शेतकऱ्यांना ; कष्टकरी कामगारांना ही रोजगार मिळणार असल्याने सर्व वर्गांना लाभ देणारे आत्मनिर्भर भारत अभियान आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून २०० कोटीपर्यंतचे टेंडर जागतिक टेंडर न काढता भारतीय उद्योजकांना ठेकेदारांना टेंडर  देण्यात येईल. यासारख्या अनेक योजना राबवून भारताला स्वबळावर मजबूत करणारे आत्मनिर्भर अभियान आहे. कोरोनाच्या संकटकाळात हे अभियान जाहीर करून सर्व वर्गांना लाभ देण्याचा दूरदृष्टीचा विचार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही जाहीर आभार मानतो असे रामदास आठवले म्हणाले. कोरोना वर मात करण्यासाठी लॉकडाऊन हाच उपाय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला असून चौथा लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करीत असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.