ramdas athavale

सफाई कामगारांना(sweepers) त्यांच्या मालकी हक्काचे घर मिळवुन देण्यासाठी म्हाडा ; मनपा आणि सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे एकत्रित प्रयत्न करण्यात येईल त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले(ramdas athavale) यांनी केले.

  मुंबई:  मुंबई महापालिकेतील(bmc) २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना(sweepers) डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून त्यांच्या मालकी हक्काची घरे(homes) देण्याची राज्य सरकारची योजना आहे. म्हाडाद्वारे ती योजना मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये राबवावी. सफाई कामगारांना(sweepers) त्यांच्या मालकी हक्काचे घर मिळवुन देण्यासाठी म्हाडा ; मनपा आणि सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे एकत्रित प्रयत्न करण्यात येईल त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले(ramdas athavale) यांनी केले.

  आज म्हाडा कार्यालयात झालेल्या बैठकीत मुंबई मनपाच्या ३हजार सफाई कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर देण्यात यावे यासाठी म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश कमलाकर जाधव यांनी विषय मांडला. त्यावर झालेल्या चर्चेत  रामदास आठवले यांनी देशातील सर्व महापालिकेतील सफाई कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय राज्य शासन आणि स्थानिक मनपा प्रशासन आणि गृह निर्माण विभाग म्हाडा यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ असे रामदास आठवले म्हणाले.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याची घोषणा केल्यानंतर देशभरातील सर्वच राज्यात मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खाजगी गृहनिर्माण उद्योगात वेग आला. महाराष्ट्रात सर्वाधिक घरे बांधण्यात आली आहेत. असे असले तरी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेश परिसरात आणि सम्पूर्ण महाराष्ट्रातील गरिब, सर्वसामान्य आणि मध्यमवर्गातील लोकांना नियमानुसार त्यांच्या हक्काचे घर त्यांना मिळावे म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आक्रमक झाले असून लोकांच्या घरांचा प्रश्न निकाली निघावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असा विश्वास रामदास आठवले यांनी म्हाडामध्ये व्यक्त केला.

  म्हाडा, झोपू योजनेसह एकूणच गृनिर्माण योजनांमध्ये अडचणीत असलेल्या नागरिकांच्या घरांच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्य भवनात वेगवेगळ्या योजनेतील उच्च अधिकारी यांच्याशी बैठकी दरम्यान चर्चा केली. या बैठकीला म्हाडा,झोपू, धारावी, मुंबई महानगर पालिका आणि विविध गृहनिर्माण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. तसेच ज्या नागरिकांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता ते नागरिक आणि संस्था या बैठकीला उपस्थित होते.

  मुंबई, महारष्ट्रासह देशांतील प्रत्येक नागरिकाला घर मिळाले पाहिजे. केंद्र सरकारची तशी योजना आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य आणि मध्येमवर्गाला त्याचे हक्काचे घर त्याला मिळाले पाहिजे. त्यामुळे म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसनातीळ सर्व नागरिकांना घरे मिळाली पाहिजेत. म्हाडाच्या सर्व मंडळातील योजनेतील घरे लाभार्थीना मिळाली पाहिजेत. बीडीडी, धारावी सारखे प्रकल्प आणि शिवालिक बिल्डर झोपू योजनेसारखी अनेक योजनेतील रखडलेली घरे नागरिकांना मिळाली पाहिजेत. तो त्यांच्या अधिकार आहे. हि घरे नागरिकांना मिळावी मी स्वतः सातत्याने पाठपुरावा करणार असलयाचे आठवले यांनी सांगितले.घर हा जिवाळ्यचा आणि जगण्याचा अत्यंत महत्वाचा विषय असून हा प्रश्न सोडवण्यासाठी मी आक्रमक राहीन असेही आठवले यांनी जाहीर केले आहे.

  बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व विभागातील उच्चपदस्थ अधिकारी यांना आठवले यांनी योग्ये पावले उचलण्याचा सूचना दिल्या असून यापुढे पुन्हा पुन्हा अधिकारी यांच्याशी बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

  राज्य सरकारचा महत्वकांक्षी बीडीडी प्रकल्प रखडला असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या. तर खार जव्हारनगर आंबेवाडी शिवालिक बिल्डरने घरे दिली नाहीत रहिवाशांना बिल्डर भाडे देत नाही. घरे ही देत नाही असे ही प्रश्न बैठकीत आले. तर म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना हक्काची घरे म्हाडाने द्यावी, पेन्शन द्यावी असा प्रश्नी कामगार संगठनांनी मांडला. तर मुंबईतील सफाई कामगारांना मोफत घर मिळण्यासाठीची योजना तात्काळ राबविण्यात यावी, मुंबईतील आणि इतर ठिकाणच्या रखडलेल्या झोपू योजना मार्गी लावण्यात याव्या. धारावीचा रखडलेला पुनर्विकासाला तात्काळ गती द्यावी. तसेच म्हाडातील विविध मंडळातील गृनिर्माण योजना मार्गी लावाव्यात. अडचणीत असलेलया अनेक गृहनिर्मांबाबत अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आल्या. यावर विविधांगाने चर्चा झाली.