लॉकडाऊन वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्यच – आठवले

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात १८ मे ते ३१ मे पर्यंत चौथा लॉकडाऊन लागु करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे. राज्यात कोरोना महामारीचे संकट समूळ

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात १८ मे ते ३१ मे पर्यंत चौथा लॉकडाऊन लागु करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे. राज्यात कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट होण्यासाठी आवश्यकता वाटल्यास लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ करण्यास रिपब्लिकन  पक्षाचा पाठिंबा राहील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मे पर्यंत तीन लॉक डाऊन जाहीर केले होते. त्यानंतर १८ मे पासून देशात चौथा  लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी  सर्व राज्य सरकारांशी चर्चा करून जाहीर केला होता. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही स्वागत करतो. कोरोना विरुद्ध सुरू असलेला हा लढा जागतिक महायुद्ध ठरला आहे. कोरोनाचा संसर्ग खतरनाक आहे. देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात भारत चीनपेक्षा पुढे गेला आहे. मुंबई महाराष्ट्र रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविणे आवश्यक होते. कोरोनाला हरविण्यासाठी लॉकडाऊनचे नियम पाळणे आवश्यक आहे. केंद्र सरकार चौथ्या लॉकडाऊन बाबत नियमावली जाहीर करेल,  त्याचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दी करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.