‘गो कोरोना गो’ चा नारा देणारे रामदास आठवले पून्हा चर्चेत; आता म्हणतात…

'मी 20 फेब्रुवारीला 'गो कोरोना गो'ची नारा दिला होता. यानंतर देशभरातील कोरोनाचा प्रसार कमी झाला. कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत असे आठवले यांचे म्हणणे आहे. पुढील आणखी ६ ते ७ महिने कोरोना राहिल. नंतर, मात्र त्याला हद्दपार व्हावंच लागेल असेही ते म्हणाले. तसेच पुढील एक-दोन महिन्यात देशात कोरोना लस उपलब्ध होईल असा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ‘गो कोरोना गो’ ही घोषणा चांगलीच चर्चेत आली होची. ‘गो कोरोना गो’ या वक्याने तर सोशल मिडीयवर धुमाकुळ घातला होता. कोरोना आणि कोरोना लसी बाबात आता त्यांनी एक नव वक्तव्य केले आहे. यामुळे आता रामदास आठवले पून्हा एकदा चर्चेत आले आहेत.

‘मी 20 फेब्रुवारीला ‘गो कोरोना गो’ची नारा दिला होता. यानंतर देशभरातील कोरोनाचा प्रसार कमी झाला. कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत असे आठवले यांचे म्हणणे आहे. पुढील आणखी ६ ते ७ महिने कोरोना राहिल. नंतर, मात्र त्याला हद्दपार व्हावंच लागेल असेही ते म्हणाले.
तसेच पुढील एक-दोन महिन्यात देशात कोरोना लस उपलब्ध होईल असा दावाही त्यांनी केला आहे.

आपल्या हटके वक्तव्यामुळे आठवले नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचा ‘गो कोरोना गो’ हा नारा प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर आठवले आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली. मात्र, अवघ्या काहीच दिवसात कोरोनावर मात करत ते घरी परतले.